Tuesday, 31 July 2018

पिंपरी पालिकेचे संकटमोचक आमदार लक्ष्मणभाऊ जगताप

पिंपरीः भाजप सत्ताधारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अडचणीत पक्षाचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप हे वारंवार धावून जात असल्याचे गेल्या काही महिन्यात आढळून आले आहे. त्यामुळे पालिकेचे संकटमोचक अशी त्यांची इमेज तयार झाली आहे. आताही खड्ड्यांवरून पालिका व सत्ताधारी लक्ष होताच पुन्हा भाऊंनी आपली संकटमोचकाची भुमिका पार पाडली.

शिवसेना खासदार आढळरावांना भाजपचा झटका

दिल्ली  : केंद्र सरकारच्या योजनांवर देखरेख करण्यासाठीच्या दिशा समितीचे अध्यक्षपदावरून शिवसेनेचे ज्येष्ठ खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची अचानक गच्छंती करून त्यावर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे. गेली 12 वर्षे आढळराव अध्यक्षपदावर होते.

पद्मनाभन पिंपरी-चिंचवडचे पहिले पोलिस आयुक्त

राज्यातील अप्पर पोलिस महासंचालक दर्जाच्या अकरा अधिकार्‍यांच्या बदल्यांचे अधिकृत आदेश गृहविभागाने सोमवारी दुपारी काढले. नव्याने स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे पहिले आयुक्त म्हणून आर. के. पद्मनाभन यांची वर्णी लागली आहे. तर पुण्याचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून डॉ. के. वेंकटेशम यांची नियुक्ती झाली आहे,  कारागृह विभागाचे प्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची बदली नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची बदली महामार्ग विभागाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून करण्यात आली आहे.

महापालिकेच्या ‘वायसीएम’ पदव्युत्तर पदवी इन्स्टिट्युट समन्वयकपदी साईनाथ लाखे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संत तुकारामनगर येथील यशंवतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात (वायसीएम) स्वतंत्रपणे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट) सुरू करण्यात येणार आहे. या इन्स्टिट्युटच्या समन्वयकपदी रूग्णालयाचे मुख्य लिपिक साईनाथ लाखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पिंपरी शहरातील प्रदूषण पातळीत वाढ

पिंपरी - वाढते शहरीकरण, औद्योगिक क्षेत्र आणि वाहनांच्या संख्येत होत असलेली वाढ यामुळे शहरातील हवा प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर येथे केलेल्या हवेच्या गुणवत्ता तपासणीत नायट्रोजन डायऑक्‍साइडचे प्रमाण दुपटीने, तर मोशी कचरा डेपोजवळील परिसरात सूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्याचे निदर्शनास आले. महापालिकेच्या २०१७-१८च्या पर्यावरण अहवालात हा निष्कर्ष आहे. 

बीआरटी रस्त्याचे केले गोडाऊन

पिंपळे-सौदागर – सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी, यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून केलेल्या बीआरटीएस मार्गांपैकी बहुतेक मार्ग धूळखात आहेत. पिंपळे सौदागर मधील कोकणे चौक ते कासारवाडी बीआरटी रस्ता दोनच वर्षांपूर्वी करोडो रुपये खर्चून बनवण्यात आला. परंतु या ठिकाणी या रस्त्याला गोडाऊनचे स्वरुप आले आहे. महानगरपालिका प्रशासन नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्या वतीने करण्यात आला असून याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी देखील समितीने केली आहे.

अजूनही भुयारी मार्गाचे काम अर्धवट

रहाटणी – उद्‌घाटन होऊन दोन वर्षे उलटून गेली तरीही काळेवाडी डी-मार्ट येथील भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले नाही. केवळ लोकप्रियता आणि श्रेयासाठी भुयारी मार्गाचे उद्‌घाटन करण्यात आले की काय? असा सवाल नागरीक उपस्थित करीत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात उद्‌घाटन झालेल्या भुयारी मार्गाचे काम भाजपने देखील अद्याप पूर्ण केले नसल्याने नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे.