राज्यातील अप्पर पोलिस महासंचालक दर्जाच्या अकरा अधिकार्यांच्या बदल्यांचे अधिकृत आदेश गृहविभागाने सोमवारी दुपारी काढले. नव्याने स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे पहिले आयुक्त म्हणून आर. के. पद्मनाभन यांची वर्णी लागली आहे. तर पुण्याचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून डॉ. के. वेंकटेशम यांची नियुक्ती झाली आहे, कारागृह विभागाचे प्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची बदली नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची बदली महामार्ग विभागाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून करण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment