शहरावर पाण्याचे संकट कायम: पिंपरी । दि. १२ (प्रतिनिधी)
धरण क्षेत्रात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकरी वर्गाबरोबरच पिंपरी-चिंचवडकर चिंताग्रस्त आहेत. पवना धरणात आजअखेर केवळ २0.२८ टक्के साठा शिल्लक आहे. आठवडाभरात पाऊस पडला नाही, तर शहरावर पाणी कपातीचेसंकट ओढावणार असल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले.
अतिपर्जन्यमानाचे क्षेत्र म्हणून मावळ, मुळशी परिसर ओळखला जातो. येथील धरणातून पिंपरी-चिंचवड शहरांसह तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, कामशेत, हिंजवडी आदी प्रमुख भागांसह मावळ, मुळशीतील ४0 गावांना पाणीपुरवठा होतो. पवना, वडिवळे, मुळशी, कासारसाई, आंद्रा धरण या जीवनवाहिन्या आहेत. मात्र, अद्यापही पाऊस न झाल्याने धरणांतील साठा दिवसेंदिवस कमीच होत चालला आहे.
No comments:
Post a Comment