Wednesday, 22 August 2012

कासारसाई धरण 87 टक्के भरले

कासारसाई धरण 87 टक्के भरलेसोमाटणे - कासारसाई धरणात 87 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या महिनाभरात पवनमावळात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे शेतीला वरदान ठरणारे कासारसाई व पवना धरणात पुरेसा पाणीसाठा झाला. त्यामुळे शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. कासारसाई धरण परिसरात आजअखेर 392 मिलिमीटर पाऊस झाला असून, धरणात 15.40 दशलक्ष घनमीटर साठा झाला आहे. धरण 87.67 टक्के भरले आहे. मळवंडी, आढले, पाचाणे ही धरणे यापूर्वीच भरली आहेत.

No comments:

Post a Comment