http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32568&To=5
'निवारा संरक्षण मोर्चाला' पोलिसांची परवानगी
पिंपरी, 21 ऑगस्ट
बेकायदा बांधकामांवरील कारवाई थांबविण्याच्या मागणीसाठी शिवसेना, भाजप, आरपीआय, मनसे आणि नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतीने गुरुवारी (ता. 23) काढण्यात येणा-या निवारा संरक्षण मोर्चाला पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही असे आश्वासन मोर्चाच्या संयोजकांकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिल्याचे परिमंडळ तीनचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी मंगळवारी (ता.21) पत्रकार परिषदेत सांगितले.
No comments:
Post a Comment