Tuesday, 9 October 2012

भाडेकरूंची माहिती एका क्लीकवर

भाडेकरूंची माहिती एका क्लीकवर: पिंपरी । दि. ६ (प्रतिनिधी)

घातपाताची शक्यता गृहीत धरून भाडेकरूंची माहिती संकलित करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. शहरातील तब्बल ५ लाख भाडेकरूंची माहिती ४ महिन्यांत संकलित व्हावी, यासाठी पोलिसांनी प्रोग्राम डिझाईन केला आहे. त्यानुसार काम सुरू झाले असून, भाडेकरूंची माहिती एका क्लीकवर उपलब्ध होईल, अशी माहिती उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली.

पुण्यातील बॉम्बस्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस अधिक सजग झाले आहेत. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणारे विघ्नसंतोषी लोक भाडेकरू म्हणून शहरात आसरा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणूनच नोंद मोहीम प्रभावीपणे राबवा अशा सूचना सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत. त्यासाठीचे अर्ज देण्यात आले असून, त्यामध्ये संबंधित भागाचे नाव, सोसायटीचे नाव, सदनिका क्रमांक, घरमालक व भाडेकरूचे नाव, दोघांचा पत्ता व मोबाइल क्रमांक, भाडेकरूचा व्यवसाय, त्याच्या मूळ पत्त्याजवळील ठाणे, राहण्याचा कालावधी, पारपत्र , पॅनकार्ड क्रमांक, भाडेकरूच्या पूर्वीच्या ठिकाणचा पत्ता, परिवारातील सदस्य संख्या करार दिनांक अशी माहिती संकलित केली जाणार आहे. मालक व भाडेकरूचा फोटोही अर्जासोबत आवश्यक आहे.

माहिती संकलनासाठी संबंधित सोसायटीतील पदाधिकार्‍यांची मदत घेतली जाईल. शहरात २३ पोलीस चौक्यांमधून हे काम सुरू केले आहे. संकलित माहिती संगणकावर घेण्याची जबाबदारी चौकीतील पोलीस उपनिरीक्षकांवर सोपविली आहे. याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उमाप यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment