निगडी-देहूरोड चौपदरीकरण मार्गी: - मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोड येथे उड्डाणपूल उभारण्याच्या सूचना
किवळे । दि. २७ (वार्ताहर)
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर निगडी ते देहूरोड दरम्यान चौपदरीकरण व देहूरोड येथील लोहमार्ग ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय दरम्यान उड्डाणपूल बांधण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांना केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी ही माहिती देहूरोड येथे पत्रकार परिषदेत दिली. मुंबई येथील मंत्रालयात उपमुख्यमंत्री पवार यांनी चौपदरीकरण व उड्डाणपूल बांधण्याबाबत महामंडळाच्या अधिकार्यांची नुकतीच बैठक घेतली. महामंडळाचे उपाध्यक्ष श्रीमाळी, सचिव श्यामकुमार मुखर्जी, भेगडे, राष्ट्रवादीचे देहूरोड शहराध्यक्ष मिकी कोचर, कृष्णा दाभोळे, किशोर जगताप, गोपाल तंतरपाळे, सतीश भेगडे, नंदकुमार काळोखे, अंकुश झेंडे आदी उपस्थित होते. या बैठकीत निगडी ते देहूरोड (किमी. १२0.२00 ते किमी १२६.६५0) हा दुपदरी रस्ता तातडीने चौपदरी करणे तसेच देहूरोड येथे उड्डाणपूल उभारण्याबाबत चर्चा झाली. सर्व माहिती घेतल्यानंतर पवार यांनी अधिकार्यांना या रस्त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगून तातडीने रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू करण्याचे आदेश दिले.
No comments:
Post a Comment