फ्लेक्स लावताना पडून बोपोडीत तरुणाचा मृत्यू: पिंपरी । दि. २७ (प्रतिनिधी)
शुभेच्छा फ्लेक्स लावताना २५ फूट अंतरावरून खाली पडून २0 वर्षांच्या तरुण कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना प्रजासत्ताक दिनी सकाळी नऊच्या सुमारास बोपोडी सिग्नल चौकातील झंकार मित्र मंडळ येथे घडली. ब्रिजेश रामदास राठोड (रा. तावरे कॉलनी, अरणेश्वर, पुणे, मूळ रा. छत्तीसगड) असे त्याचे नाव आहे.
राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांच्या निवडीच्या व प्रजासत्ताक दिनाचा शुभेच्छा देणारा ऋतुगंध महिला मंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचा तो फ्लेक्स आहे. कॅप्शन पब्लिसिटीच्या होर्डिंगवर चढून राठोड तो फ्लेक्स लावत होता. तोल जाऊन तो खाली पडला. त्यात डोके व मणक्यास जबर मार लागून तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
उपचारा दरम्यान सायंकाळी साडेपाचला त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आकस्मिक अपघाती मृत्यूची नोंद बोपोडी पोलिसांनी केली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश कडू करीत आहेत.
No comments:
Post a Comment