Tuesday, 29 January 2013

सात लाखांचा ऐवज दोन दिवसांत लंपास

सात लाखांचा ऐवज दोन दिवसांत लंपास: पिंपरी । दि. २७ (प्रतिनिधी)

वाकड आणि कासारवाडीत घरफोडी करून चोरट्यांनी साडेसहा लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. तर दापोडीत पादचारी महिलेचे ५0 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. दोन दिवसांत ७ लाखांचा ऐवज हाती लागल्याने चोरटे मालामाल झाले आहेत.

वाकड येथील सनी इस्टेट या इमारतीतील सदनिका फोडून चोरट्यांनी २ लाख ८0 हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने चोरून नेले. भारद्वाज चलप्पा (३१) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी सायंकाळी पावणे पाच्चया सुमारास हा प्रकार उघडकीस आला. दुसरी घटना कासारवाडीत प्रजासत्ताक दिनी भरदिवसा घडली. घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी ३ लाख ४९ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार तुषार व्यंकटेश यादव (३0, रा. विशाल चैतन्य सोसायटी, कासारवाडी) यांनी दिली आहे.

दोपोडी येथील एस. बी. पाटील शाळेसमोरून पायी चाललेल्या संगीता राजेंद्र सोनवणे (४0, रा. गणेश गार्डन, दापोडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्या शुक्रवारी सायंकाळी पावणे पाच्चया सुमारास घराकडे पायी चालल्या होत्या. त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळयातील ४५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले.

No comments:

Post a Comment