लोकशाहीदिनी 16 अर्ज प्राप्त
पिंपरी, 4 फेब्रुवारी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या लोकशाही दिनामध्ये 16 अर्ज प्राप्त झाले. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश अतिरीक्त आयुक्त प्रकाश कदम यांनी दिले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील महापौर मधुकर पवले सभागृहात झालेल्या लोकशाही दिनी सहआयुक्त अमृत सावंत, शहर अभियंता एम. टी. कांबळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शामराव गायकवाड, अतिरीक्त आरोग्य अधिकारी डॉ. पवन साळवे, सहशहर अभियंता राजन पाटील, विकास अभियंता अशोक सुरगुडे, उपशहर अभियंता वसंत काची, सहायक आयुक्त शहाजी पवार, डॉ. उदय टेकाळे, ए. वाय. कारचे, प्रभाग अधिकारी पांडुरंग झुरे, डी. एम. फुंदे, कार्यकारी अभियंता रवींद्र दुधेकर, सतीश इंगळे, अय्युब खान पठाण, शिक्षम मंडळाचे प्रशासन अधिकारी डॉ. अशोक भोसले, प्रभारी शिक्षणाधिकारी यु. ए. कांबळे, प्रभारी कायदा सल्लागार सतिश पवार, नगरसचिव दिलीप चाकणकर, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी वि. रा, वालगुडे आदी उपस्थित होते.
मुदतीत प्राप्त झालेल्या 16 अर्जांमध्ये उद्यान स्थापत्य, अ प्रभाग जलनिःसारण विभागाशी संबंधित 3, प्रकल्प (मुंबई-पुणे रस्ता), क प्रभाग स्थापत्य विभागाशी संबंधित 2, ड प्रभाग जलनिःसारण, ड प्रभाग अधिकारी, भूमी आणि जिंदगी, क प्रभाग जलनिःसारण, वृक्षसंवर्धन, ब प्रभाग अतिक्रमण विभागाशी संबंधित प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाला आहे.
शासनाने लोकशाहीदिनासाठी नवीन अध्यादेश काढला आहे. त्यानुसार आता लोकशाहीदिनासाठी नागरिकांना 15 दिवस आधी दोन प्रतीमध्ये अर्ज सादर करावा लागणार आहे. ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे. त्या विभागाच्या विभागप्रमुखाकडे संबंधित अर्ज पाठविण्यात येईल. यावर केलेल्या कार्यवाहीच्या अहवालासह संबंधित विभागप्रमुख लोकशाहीदिनी हजर राहतील. हा अहवाल, अर्जदारांची विनंती, त्याबद्दलचे नियम, शासनाची भूमिका, तरतुदी आदींचा विचार करुन लोकशाहीदिन प्रमुख योग्य निर्णय देतील, असे अध्यादेशात नमुद आहे. महापालिका स्तरावर महापालिका आयुक्त हे लोकशाहीदिनाचे प्रमुख म्हणून काम पाहतील, असेही त्यात नमूद आहे.
-------------------------------
No comments:
Post a Comment