चिखलीत टपाल कार्यालयाचे उद्घाटन
पिंपरी, 4 फेब्रुवारी
चिखली येथे नुकतेच टपाल कार्यालय सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन नगरसेवक दत्ता साने यांच्या हस्ते झाले. चिखलीत सुरू झालेल्या या नवीन टपाल कार्यालयाचा पिनकोड 411062 असा आहे. सकाळी आठ ते सायंकाळी चार या कालावधीत टपालाचे कामकाज सुरू राहणार आहे. यामध्ये स्पीड पोस्ट, रजिस्टर, पार्सल, टेलिफोन बिल, पीएलआय मनिऑर्डर आणि विविध बचत योजनांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.
याप्रसंगी टपला विभागाचे वरिष्ठ अधिक्षक के. वाय. कांबळे, एपीएमजी धर्माधिकारी, सहायक अधीक्षक एस. डी. मोरे, डी. आर. देवकर, के. एस. पारखी, डी. के. गोडसे, राजु कर्पे, अशोक अवघडे, पीआरआय एस. जी. डुंबरे, सुरेश शेलार, सामाजिक कार्यकर्ते विकास साने, रोहिदास मोरे, प्रमोद साने, विजय मोरे, प्रवीण पिंजण, श्री. पाखरे, चिंचवडचे उप पोस्टमास्तर श्री. सिंहस्थे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment