Tuesday, 5 February 2013

'त्या' हॉटेलवर कारवाईसाठी तात्पुरती स्थगिती

'त्या' हॉटेलवर कारवाईसाठी तात्पुरती स्थगिती
पिंपरी, 4 जानेवारी
पिंपरी चौकात वाहनतळाच्या जागेत उभारलेल्या अवैध हॉटेल व्यावसायिकाला शासनाकडे अपील करण्याची मुभा उच्च न्यायालयाने दिली आहे. हॉटेलवरील कारवाईसाठी न्यायालयाने महापालिकेला दोन आठवड्यांचा स्थगिती आदेश दिला आहे.

पिंपरी चौकाजवळील वाहतळाच्या जागेत रत्ना या नावाने हॉटेल सुरु करण्यात आले आहे. इमारतींमधील वाहनतळाच्या जागेत बेकायदेशीपणे सुरू करण्यात आलेल्या या हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी पिंपरीतील एका सामाजिक कार्यकर्त्याने केली होती.

अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणा-या महापालिकेने या हॉटेलवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यावर महापालिकेने संबंधित हॉटेलला कारवाईसाठी नोटीस बजाविली. याविरोधात संबंधित हॉटेल व्यावसायिकाने न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने वाहनतळाच्या जागेत हॉटेल नियमानुकूल करण्याचा दावा फेटाळला. त्यावर व्यावसायिकाने शासनाकडे अपील करण्याची मुभा न्यायालयाकडे मागितली होती. तोवर महापालिकेची कारवाई स्थगित ठेवण्याची याचना केली होती. त्यानुसार न्यायालयाने हॉटेल मालकाला शासनाकडे अपील करण्याची मुभा दिली आहे. त्यासाठी दोन आठवड्याची मुदत दिली आहे. या मुदतीमध्ये महापालिकेला कारवाई स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती अतिरीक्त आयुक्त प्रकाश कदम यांनी दिली.

No comments:

Post a Comment