सेट टॉप बॉक्स न बसविल्याने नोटीस: पुणे : सेट टॉप-बॉक्सशिवाय केबल चालविणार्या पिंपरी-चिंचवड परिसरातील एका केबलचालकाला करमणूक कर विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यापुढील काळात सेटटॉप-बॉक्स शिवाय केबल चालविणा-यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असे करमणूक कर विभागाच्या तहसीलदार मोहिनी चव्हाण यांनी सांगितले.
चव्हाण म्हणाल्या, की सेटटॉप बॉक्सशिवाय केबल चालविता येणार नाही, असे आदेश सर्व केबलचालकांना देण्यात आले होते. त्यानुसार काही केबलचालकांनी आपल्या ग्राहकांना सेटटॉप बॉक्स बसवून दिले. परंतु काही केबलचालक आदेशाचे पालन न करताच व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे काही ठिकाणी धाडी टाकून तपासणी करण्यात आली. नवी सांगवी भागातील एका केबलचालकाला पकडण्यात आले. आदेशाचे पालन न करणार्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. केबलचालकाकडे प्रत्येक ग्राहकाने कस्टमर रेफर्स फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. जे ग्राहक हा फॉर्म भरून देणार नाहीत, त्यांना केबलवरील कोणतेही चॅनल दिसणार नाही, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
No comments:
Post a Comment