Friday, 31 May 2013

राजेंद्र दीक्षित यांचे बहारदार गायन

राजेंद्र दीक्षित यांचे बहारदार गायन: पिंपरी : अंगारकी चतुर्थी संगीत सभा मंगळवारी मंगलमूर्तीवाडा, चिंचवडगाव येथे झाली. चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि अनाहत संगीत अकादमी प्रस्तुत संगीत सभेत पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य राजेंद्र दीक्षित यांचे बहारदार शास्त्रीय गायन झाले. त्यास उपस्थितांनी उत्कट दाद दिली.

कार्यक्रमाची सुरुवात यमन रागातील कहे सखी कैसे के या विलंबित ख्यालाने झाली. भारदस्त आवाज, स्वरांचा पक्केपणा यामुळे पहिल्या स्वरापासून मैफल रंगत गेली. श्याम बजापे या द्रुत चितालातील चीजेने यमनची रंगत खुलविली. शास्त्रीय गायनानंतर राजेंद्र यांनी पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, गणपती गणराया, ध्यान करू जाता मन हरपले हा अभंग सादर केला. अगा वैकुंठीच्या रामा या अभंगाने मैफलीची सांगता केली. कलाकारांचे स्वागत डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी केले. साथसंगत लीलाधर चक्रदेव (संवादिनी), विष्णू कुलकर्णी (तबला), अपूर्वा कायाळ, सारथी मेहता (तानपुरा), मकरंद बादरायणी (टाळ) यांनी केली. (प्रतिनिधी)

No comments:

Post a Comment