छायाचित्रण स्पर्धेत युवराज पाटील प्रथम: पिंपरी : महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळातर्फे जागतिक जैवविविधता दिनानिमित्त आयोजित वन्य महाराष्ट्र छायाचित्रण स्पर्धेत येथील थिसेनक्रुप इंडस्ट्रिजचे कामगार युवराज पाटील यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.
स्पर्धेमध्ये ५00 पेक्षा अधिक छायाचित्रे आली होती. वन्य महाराष्ट्र निसर्ग परिसंस्था व अन्य महाराष्ट्र- वनस्पती व प्राणी या विषयांवरील छायाचित्र स्पर्धेसाठी मागविण्यात आली होती. १३0 स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. छायाचित्रांचे प्रदर्शन कै. वसंतराव बागुल उद्यान, सहकारनगर, पुणे येथील पंडित भीमसेन जोशी कला दालनात सुरू आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे मनपा आयुक्त महेश पाठक व पाणलोट विषयातील तज्ज्ञ डॉ. विजय परांजपे यांच्या हस्ते झाले. मंडळाचे अध्यक्ष डॉ. एरच भरुचा, सदस्य सचिव अनमोल कुमार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment