Friday, 31 May 2013

एकाच वेळी ३३ जण मनपा सेवेतून नवृत्त

एकाच वेळी ३३ जण मनपा सेवेतून नवृत्त: पिंपरी : ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, लेखाधिकारी, प्रशासन अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षक अशा महत्त्वाच्या पदांवर काम करणार्‍या अधिकार्‍यांबरोबर लिपिक, परिचारिका, आरोग्य सहायक, सफाई कामगार, रखवालदार, मुकादम अशा पदांवरील एकूण ३३ जण ३१ मे रोजी महापालिका सेवेतून नवृत्त होत आहेत, तर सात जणांनी स्वेच्छानवृत्ती स्वीकारली आहे.

मेअखेर नवृत होणार्‍या अधिकार्‍यांमध्ये वायसीएमचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्याम गायकवाड, डॉ. जयंत हांडे, डॉ. ध्रुव जेरे या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांचा समावेश आहे. तसेच लेखाधिकारी डी. वाय गायकवाड, सुनीता फाटक, नारायण कांबळे हे प्रशासन अधिकारी, रघुनाथ भंडलकर,सुरेश साळुंखे, महादेव गायकवाड, छबू लांडगे हे कार्यालयीन अधीक्षक नवृत्त होत आहेत.या महत्त्वाच्या पदावरील अधिकार्‍यांसह अन्य अधिकारी आणि कर्मचारी मिळून ३३ जण नवृत्त होत आहेत. महत्त्वाच्या पदावरील अधिकार्‍यांची कमतरता भासत आहे. नवृत होणार्‍या अधिकार्‍यांची संख्या मोठी असल्याने कामकाजाचे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. (प्रतिनिधी)

No comments:

Post a Comment