Friday, 31 May 2013

सिटी प्राईड शाळेला ई-महाराष्ट्र पुरस्कार

सिटी प्राईड शाळेला ई-महाराष्ट्र पुरस्कार: पिंपरी : महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जाणारा ई-महाराष्ट्र पुरस्कार निगडी येथील सिटी प्राईड शाळेला प्राप्त झाला आहे. शाळेमध्ये उत्कृष्ट माहिती आणि तंत्नज्ञानाचा वापर करणार्‍या शाळेला राज्य शासनाकडून हा पुरस्कार दिला जातो.

शासनाच्या माहिती व तंत्नज्ञान विभागाचे सचिव राजेश आगरवाल आणि हरीयाना सरकारच्या माहिती व तंत्नज्ञान विभागाचे अतिरिक्त सचिव विवेक अत्ने यांच्या हस्ते मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. त्यावेळी सिटी प्राईड शाळेच्या संचालिका डॉ. अश्‍विनी कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ई-शाळा उपक्रमामध्ये सिटी प्राईड शाळेने सहभाग घेतला होता. त्यासाठी शाळेमध्ये माहिती तंत्नज्ञानाचा वापर करून शाळेच्या कार्यप्रणालीत बदल घडवून आणल्याबद्दल शाळेला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

No comments:

Post a Comment