आम आदमी पक्षाच्या संयोजकपदी भापकर: पिंपरी : पुणे जिल्हा आम आदमी पक्षाच्या जिल्हा संयोजकपदी मारुती भापकर व सचिवपदी आभा मुळे यांची तर कोषाध्यक्षपदी श्रीकांत आचार्य यांची निवड करण्यात आली.
भापकर हे जनचळवळीतील कार्यकर्ते आहेत. महापालिका निवडणुका व २00९ च्या मावळ लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत २00७ ते २0१२ या कालावधीत ते नगरसेवक होते. वॉर्डसभेच्या माध्यमातून नगरसेवक कामकाज करणारे ते भारतातले पहिले नगरसेवक मानले जातात. पुणे जिल्ह्यातील माण, कार्ला, रायगड, सिन्नर, गोराई येथील विशेष आर्थिक क्षेत्र (एसआयझेड) च्या विरोधात त्यांनी रान पेटवून आंदोलने करून शेतकर्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. माहितीचा अधिकार, जनलोकपाल आंदोलन, दिल्ली मुंबई औद्योगिक पट्टा आंदोलन, लवासा आंदोलन, पिं. चिं. शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. (प्रतिनिधी)
No comments:
Post a Comment