पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे २०१४-१५ चे सुमारे १०५ कोटी रुपये शिलकीचे बजेट मंगळवारी (२८ जानेवारी) मंजूर करण्यात आले. कोणत्याही नावीन्यपूर्ण योजनेचा समावेश नसलेल्या या बजेटमध्ये गृहप्रकल्पांसाठी एकूण जमेच्या केवळ दहा टक्के रकमेची तरतूद करण्यात आली आहे.