Monday, 17 February 2014

तरतुदींची पळवापळवी नको

पिंपरी : महापालिकेचा ‘जेएनएनयूआरएम’सह ३४00 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली. नवनियुक्त आयुक्त राजीव जाधव यांच्या १५ प्रस्तावांची जोड देण्यात आली. कोणताही लेखी प्रस्ताव नसताना स्थायी समितीनेही अर्थसंकल्प मंजूर केला. तरतुदींची पळवापळवी होऊ देऊ नका, उपसूचनांचा अभ्यास करूनच त्या स्वीकारा, अशा सूचना या वेळी आशा शेंडगे यांनी केल्या. तसेच ‘लॉक इन बजेट’ची मागणी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी नवनाथ जगताप होते. 

No comments:

Post a Comment