पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. औद्योगिकरणात वाढ झाली आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबच शहरातील गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महिला, विद्यार्थींनी यांची सुरिक्षतता राखण्यासाठी पोलिस यंत्रणा कमी पडत आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा रखडलेला प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची मागणी, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत केली. तसेच अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या दुरावस्थकडे लक्ष्य वेधत त्याच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने मदत करण्याची मागणी देखील त्यांनी केली.
No comments:
Post a Comment