योगेश बहल यांची टीका : …म्हणून स्थायीची निवडणूक लढवली
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप सभागृह लोकशाही पद्धतीने चालवत नाहीत. हुकूमशाही पद्धतीने सभागृह चालविले जात आहे. भाजपच्या या हुकूमशाही, दडपशाहीचा निषेध म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक लढविल्याचे, विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी सांगितले. तसेच पालिका प्रशासन भाजपच्या तालावर नाचत आहे. एखादी माहिती मागविल्यास प्रशासनाकडून ती देण्यास टाळाटाळ केली जाते, असा आरोप देखील त्यांनी प्रशासनावर केला आहे.
No comments:
Post a Comment