Thursday, 8 March 2018

पिंपरी-चिंचवडचं क्रीडारत्न!

– राज्य शिव छत्रपती पुरस्कार विजेती पूजा शेलार
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाहन चालकाची लेक असलेल्या पूजा शेलार हिने कबड्डी खेळाच्या माध्यमातून शासनाच्या शिव छत्रपती पुरस्कारापर्यंत झेप घेतली आहे. विशेष म्हणजे वडिलांचे क्रीडा क्षेत्रातील नाव लौकीकाचे स्वप्न तिने प्रत्यक्षात आणले आहे. महिला खेळाडूंसाठी स्वतंत्र क्रीडा ऍकॅडमी सुरु करण्याचा तिचा मानस आहे.
शंकर शेलार हे गेल्या 30 वर्षांपासून महापालिका सेवेमध्ये वाहन चालक या पदावर कार्यरत आहेत. त्यांना कुस्ती व कबड्डी खेळाची आवड आहे. परंतु, नोकरीमुळे त्यांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागली. त्यांना योजना व पुजा अशा त्यांना दोन लेकी आहेत. त्यांनी आपले क्रीडा क्षेत्रात नाव कमावण्याचे स्वप्न मुलींच्या माध्यमातून पाहिले. एवढेच नव्हे तर त्यादृष्टीने त्यांना प्रोत्साहन देखील दिले. योजना व पुजा या दोघींनाही कबड्डीची आवड आहे.

No comments:

Post a Comment