जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवीचे ग्रामदैवत श्री वेताळ महाराज उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सचिन ढोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान ग्रामदैवत श्री वेताळ महाराजांचा उत्सव विविध धार्मिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो. तीन दिवस चालणाऱ्या ऊरूसात (जत्रेत) सांगवी व परिसरातील नागरीकांसाठी पर्वणी असते. यावर्षी काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, भजन, हरिपाठ, हरिकीर्तन, जागर तसेच अखंड हरिनाम सप्ताह, पालखी व काठी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे. १८ मार्च ते २६ मार्च पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम चालणार असल्याचे ग्रामदैवत श्री वेताळ महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष युवराज ढोरे यांनी सांगीतले.
No comments:
Post a Comment