पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षाची निवड दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी भाजपची सदस्यसंख्या अपक्ष धरून तब्बल 11 आहे; मात्र मतदानाच्या वेळी दगाफटका होऊ नये म्हणून पक्षाने समितीच्या सदस्यांना ‘व्हिप’ जारी करून पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करण्याची सक्त ताकीद दिली आहे. मत फुटल्यास कारवाईचे संकेत दिले आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोरेश्वर भोंडवे यांच्याकडून भाजपच्या नाराज सदस्यांना गोंजारण्यात येत असून, त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू आहे.
No comments:
Post a Comment