भोसरी - मित्राच्या वाढदिवशी दुचाकीवर कर्णकर्कश आवाज करत रस्त्यावरून फिरणे... दुचाकी रस्त्यावर आडवी लावून रस्ता अडवून वाढदिवस साजरा करणे... छोट्याशा कारणावरून दुकानाची तोडफोड करणे... रस्त्यावरील वाहनचालकांशी अरेरावी करणे आदी प्रकार भोसरीत नित्याचेच झाले आहेत. मात्र या तरुणाईचा, एका अल्पवयीन मुलीला विनाकारण मारण्याचा प्रकार नुकताच घडला असल्याने या तरुणाईच्या बेदरकारपणाचा कळस झाला आहे. या बेदरकार तरुणाईवर वेळीच आळा घातला नाही, तर भविष्यात गंभीर स्वरूपाचे प्रकार होण्याची शक्यता आहे. अशा तरुणांवर वेळीच कारवाई झाली नाही, तर रस्त्याने मुली व महिलांचे जाणेही अवघड होणार आहे. त्यामुळे या तरुणाईला आवरण्याचे मोठे आवाहन भोसरी पोलिसांपुढे आहे.

No comments:
Post a Comment