पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएल बसेसच्या फेर्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबरोबरच अपुर्या मेटेंनन्समुळे जुन्या बसेस खराब झाल्याने पीएमपीएमएल प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्याबाबत शहरातील नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सुमारे 1 हजार 460 बसेस रस्त्यावर धावत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात 764 परिवहन बसेस आहेत. त्यामधील 611 बसेस सध्या धावत आहेत. यामध्ये 80 टक्के बसेस चांगल्या अवस्थेत आहेत, तर 20 टक्केबसेस सध्या खराब अवस्थेत आहेत. पुणे परिवहन मंडळाच्या 1 हजार 200 बसेसपैकी 250 बसेस आणि भाडे कराराच्या 653 पैकी 200 बसेस ची दुरवस्था झाली आहे. एका बसचे आयुर्मान 12 वर्षांपर्यंत असून आठ लाख चाळीस हजार किलो मीटरपर्यंत बस धावते. पीएमपीएमएलच्या बसेस अपुर्या मेंटन्समुळे रस्त्यावरच बंद पडत आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. 1200 बसेसपैकी 25 टक्केबसेस वाईट अवस्थेत आहेत.
No comments:
Post a Comment