नद्यांची प्रदुषण विळख्यातून होणार सुटका
निर्भीडसत्ता न्यूज –
अतिप्रदुषित नद्यांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील पवना व इंद्रायणी नदीचा समावेश आहे. या नद्यांच्या प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, त्यामुळे नदी सुधार प्रकल्पांच्या माध्यमातून पवना आणि इंद्रायणी नद्यांची प्रदुषणाच्या विळख्यातून सुटका करण्यास भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेतला आहे. त्या प्रकल्पाचा आराखडा अहमदाबाद शहरातील नद्यांच्या धर्तीवर हा सुधार प्रकल्प राबविणार आहे. याकरिता तांत्रिक सल्लागार नेमणूकीला मंजूरी दिली. तसेच शहरातील विविध विकास कामे करण्यासाठी 184 कोटी रुपयाला आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समिती सभेत मंजूरी देण्यात आली,अशी माहिती स्थायी समिती सभापती ममता गायकवाड आणि स्थायी समिती सदस्य विलास मडेगिरी यांनी दिली. या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.
No comments:
Post a Comment