बोपोडी सिग्नल चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हॅरीस पुलास बांधण्यात येणार्या समांतर पुलाचे काम पुर्ण झाले आहे; परंतु काम पुर्ण झाले असून उद्घाटन केले जात नाही. त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. उद्घाटनासाठी भाजप नेत्यांना वेळ नसल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी ईदच्या मुहुर्तावर हॅरीस पुल नागरिकांसाठी खुला केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात आले.

No comments:
Post a Comment