Sunday, 17 June 2018

रेल्वे प्रवाशांच्या तक्रारींसाठी “डिजीटल प्लॅटफॉर्म

-“रेल मदद’ ऍप : रजिस्टर मोबाईलवर मिळणार फिडबॅक; फोटोसह तक्रार दाखल करता येणार
पुणे – प्रवाशांना रेल्वेसंबंधातील कुठलीही तक्रार आता एका क्‍लिकवर करता येणार आहे. उशीरा गाडी येणे, गाडीतील अस्वच्छता, गैरप्रकार आदींची तक्रार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने “रेल मदद’ नावाचे ऍप सुरू केले आहे. ऍपवर तक्रार केल्यानंतर तत्काळ ती संबंधीत विभागाकडे पाठवण्यात येणार असून त्यावर काय कारवाई केली याचे उत्तरदेखील प्रवाशांच्या नोंदणीकृत मोबाईलवर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रवासादरम्यान काही अडचण उद्धभवल्यास ऍपमध्ये हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून देण्यात आला असून फोटो पाठवणेही शक्‍य होणार आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने “रेल मदद’ ऍपच्या माध्यमातून प्रवाशांना एकप्रकारे “डिजीटल प्लॅटफॉर्म’ उपलब्ध करून दिला आहे.

No comments:

Post a Comment