पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीवर येणार्या ताण लक्षात घेऊन प्रशासनाने तयार केलेल्या ‘पार्किंग पॉलिसी’वर मंजुरीची मोहर शुक्रवारी (दि.22) होणार्या सर्वसाधारण सभेत उमटणार आहे. त्यास विरोधकांकडून विरोध होण्याची शक्यता आहेत. तसेच, सभेत शिक्षण समितीच्या 9 सदस्यांची निवड केली जाणार आहे. तसेच, रस्ते खोदाई आणि विविध सेवा वाहिन्यांसाठी भूमिगत कामांसंदर्भाचे धोरण निश्चित केले जाण्याची दाट शक्यता आहे. पालिकेची मे महिन्याची सर्वसाधारण सभा सलग 3 वेळा तहकूब करण्यात आली. जून महिन्याची सभाही तहकूब झाली. या दोन्ही तहकूब सभा शुक्रवारी होणार आहेत. सत्ताधारी व विरोधकांचा ‘मुड’ पाहता या दोन्ही सभेचे कामकाज होण्याची दाट शक्यता आहे.

No comments:
Post a Comment