पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी गटाराची व्यवस्थित सफाई न झाल्याने गुरुवारच्या (दि. 21) पावसाने पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच रस्त्यांवर पाणी साचून काही भागात अक्षरश: नद्याचे स्वरूप आले होते. गुडघ्यापेक्षा अधिक पाणी असल्याने वाहनचालक व पादचारी काही वेळ अडकून पडले. तसेच, चालक व पादचार्यांची मोठी गैरसोय झाली. पहिल्याच पावसात शहराची झालेली ही परिस्थिती पाहून पालिका प्रशासनाचे ‘सफाईकामा’वर शंका उपस्थित केली जात आहे.

No comments:
Post a Comment