आकुर्डीः भाजपा युवा मोर्चा, कर्तव्य फाउंडेशन आणि चैतन्य मेडिको यांच्या पुढाकाराने आणि स्टार हॉस्पिटल आकुर्डी यांच्या सहयोगाने, ईशान हॉस्पिटल, चिंचवड येथे नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा 160 नागरिकांनी लाभ घेतला. महाराष्ट्र राज्य लेखा समितीच्या सदस्य अॅड. सचिन पटवर्धन यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजयुमो शहराध्यक्ष तथा नगरसेवक रवी लांडगे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, पिंपरी-चिंचवड केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष संतोष खिंवसरा, महावितरण समिती सदस्य भारती विनोदे, प्रभाग समिती स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, देविदास पाटील, बिभीषण चौधरी, भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष, राजेंद्र चिंचवडे, भाजपा शहर पदाधिकारी पाटील चिंचवडे, कांता मोंढे, संजीवनी पांडे, रवींद्र देशपांडे, नंदू भोगले, राज दरेकर,सिद्धू लोणी, सुनील कुलकर्णी, अजय भोसले, सत्पाल गोयल, प्रवीण मुथा, सुजित आरुडे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment