सिंहासन न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या सौंदर्याला बाधा पोहचविणा-या 135 अनधिकृत फलकांवर आकाशचिन्ह परवाना विभागाने गेल्या सहा महिन्यात धडक कारवाई केली आहे. हे फलक तोडून जप्त करण्यात आले आहेत. ९८० अनधिकृत जाहिरात फलकांना आकाशचिन्ह परवाना विभागाने नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. आकाशचिन्ह परवाना विभागाने १७ जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये क्लासचालक, जाहिरात एजन्सींचा समावेश आहे. याबाबतची माहिती आकाशचिन्ह व परवाना विभागाचे सहायक आयुक्त विजय खोराटे यांनी दिली.
No comments:
Post a Comment