मंचर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. ३०) खेड तालुक्यातील राजगुरुनगर व चाकण येथे पाळण्यात आलेल्या ‘बंद’चा परिणाम मंचर (ता. आंबेगाव) येथे जाणवला. नाशिकहून पुण्याला जाणारी वाहतूक सुमारे ७ तास ठप्प होती. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे व मुंबईला जाणाऱ्या ४० एसटी गाड्या मंचर बसस्थानकावर उभ्या होत्या. त्यामुळे सकाळपासून प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

No comments:
Post a Comment