पिंपरी – दापोडीतील हॅरीस पुलाला समांतर पुलाच्या उद्घाटनास विलंब होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने रमजान ईदचा मुहुर्त साधून खुला केलेला पूल पिंपरी-चिंचवड महापालिकेने बंद केला होता. त्यावरुन टिकेची झोड उठल्यानंतर अखेर भाजपने सतरा दिवसानंतर आज (सोमवारी) या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासाठी हे उद्घाटन लांबणीवर टाकले असताना अद्यापही त्यांची वेळ न मिळाल्याने भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन उरकते घेण्यात आले.

No comments:
Post a Comment