पिंपरी – महापालिकेत विविध विकास कामांसाठी वास्तुविशारदांची नेमणूक करण्याचा घाट घालण्यात आला आहे. इमारत बांधकाम, लॅण्डस्केपिंग, इंटेरिअर डिझायनिंग अशा कामाच्या प्रकारानुसार 50 लाखापासून 10 कोटीच्या पुढील खर्चाच्या कामांसाठी वास्तुविशारदांची नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 37 वास्तुविशारदांनी महापालिकेकडे नोंदणी केली आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात 13 वास्तुविशारदांना पॅनेलवर घेण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment