Tuesday, 3 July 2018

भेटवस्तू अन्‌ अनाठायी नाठाळपणा!

पिंपरी-चिंचवड वर्तमान
निशा पिसे
—–
संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील दिंड्यांना भेटवस्तू देण्यावरुन पिंपरी-चिंचवड महापालिका वर्तुळात कलह माजला आहे. वस्तू खरेदीत होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सत्ताधारी भाजपने भेटवस्तू न देण्याचा पावित्रा घेतला आहे. तर 20 वर्षांपासूनची परंपरा खंडीत होणार असल्याचा कांगावा करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोध केल्याने राजकारण तापले आहे. नगरसेवकांच्या मानधनातून वस्तू खरेदीची तयारी भाजप व राष्ट्रवादीनेही दाखवली आहे. वास्तविकतः घरदार सोडून केवळ विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने जाणाऱ्या वैष्णवांना खरंतर कोणत्याही भेटवस्तूची आस नाही. वस्तू खरेदीवर होणारा लाखो रुपयांचा खर्च, त्यावरुन होणारे भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे महापालिकेची भेटवस्तू “न आवडे जिवाला’ असे म्हणण्याची वेळ दिंडी प्रमुखांवर आली आहे. एकीकडे अनावश्‍यक बाबींवर महापालिका लाखो रुपयांची उधळपट्टी करत असताना दिंडी प्रमुखांना भेटवस्तू देण्यासाठी आखता हात घेण्याची भूमिका आणि त्यावरुन होणारे राजकारण करदात्यांसाठी क्‍लेषदायक आहे.

No comments:

Post a Comment