Tuesday, 3 July 2018

“स्मार्ट सिटी’चा प्रवास निधीअभावी “ब्रेक डाउन’

पिंपरी – केंद्रातील भाजप सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या “स्मार्ट सिटी’ योजनेला तीन वर्षे पूर्ण झाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा योजनेतील तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला. त्याला 25 जून 2018 रोजी एक वर्ष पूर्ण झाले. महापालिकेला एका वर्षात दोनशे कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असताना केंद्र व राज्याचा केवळ 27 कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे तुटपुंज्या निधीमुळे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी योजनेचा खेळखंडोबा झाला असून, अद्याप “एरिया बेस डेव्हलमेंट’ आणि “पॅन सिटी’च्या निविदा प्रक्रियेत “स्मार्ट सिटी’ची कंपनी अडकली आहे. त्यामुळे वर्षभरानंतर स्मार्ट सिटी योजनांच्या कामांना गती मिळत नसल्याचे दिसत आहे.

No comments:

Post a Comment