पिंपरी - चिखली-मोशीदरम्यानचा इंद्रायणी नदी परिसर... अनेक भंगाराची गोदामे... रात्री दहानंतरची वेळ... काही भागांत छोट्या रस्त्यांवरून टॅंकर नदी पात्राकडे जातात... भंगार गोदामाचे भले मोठे लोखंडी गेट उघडले जाते... टॅंकर आत आल्यानंतर गेट बंद केले जाते... टॅंकरचा पाइप कूपनलिकेच्या खड्ड्यात सोडला जातो... कॉक सुरू करून टॅंकरमधील द्रवपदार्थ कूपनलिकेत सोडले जाते... ते असते रसायनयुक्त पाणी... घातक... अतिघातक... त्यामुळे आमच्या सोसायट्यांमधील बोअरवेलचे पाणीही प्रदूषित होत आहे... त्यावर तेलकट तवंग असतो... भूगर्भातील पाणीच अशा पद्धतीने प्रदूषित केले जात आहे... ही वस्तुस्थिती परिसरातील रहिवाशांनी ‘सकाळ’शी बोलताना मांडली.
No comments:
Post a Comment