विझार्डस संघाने पटकाविले विजेतेपद
चिंचवड : स्वातंत्र्यदिनानिमित्त रस्टन कॉलनी मित्र मंडळ, चिंचवडगावच्यावतीने 11 व्या स्वातंत्र्यता चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये तीस संघांनी भाग घेतला. तीन दिवस चाललेल्या स्पर्धेमध्ये विझार्डस संघाने विजेतेपद पटकाविले. विजेत्या संघाला रोख पंधरा हजार रुपये व स्वातंत्र्यता चषक करंडक देण्यात आला. स्निगमय संघाने उपविजेतेपद पटकाविले. त्यांना रोख दहा हजार रुपये व करंडक देण्यात आला.
No comments:
Post a Comment