Tuesday, 21 August 2018

जीएसटी मायग्रेशन प्रक्रियेसाठी स्वतंत्र कक्ष

पुणे - जीएसटी भरताना स्थलांतर (मायग्रेशन) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ज्या करदात्यांनी कायमस्वरूपी पत्ता दिला नाही. तात्पुरता पत्ता देत अस्थायी ओळख कागदपत्रे जमा केली आहे; परंतु मायग्रेशन प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्यासाठी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाच्या वतीने प्रत्येक जीएसटी कार्यालयामध्ये स्वतंत्र मदत कक्ष स्थापन केल्याची माहिती केंद्रीय वस्तू व सेवाकर विभागाने कळविली आहे. जीएसटी भवन, पहिला मजला, अधीक्षक (जीएसटी एकक), ई विंग, ४१ ए, ससून रस्ता, पुणे स्टेशन या ठिकाणी हे मदत कक्ष उभारण्यात आले आहे. si-pune2gst@gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment