वायसीएमएचवरील रुग्णालयीन कामाचा ताण
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरातील सर्व रुग्णालयातील गर्भवती महिलांना पुढील उपचारासाठी संत तुकारामनगर येथील ‘वायसीएमएच’ रुग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे वायसीएमवरील रुग्णालयीन कामाचा ताण येतो. त्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयात रात्रीच्या वेळी दाखल होणार्या गर्भवती महिलांना आदित्य बिर्ला रुग्णालयात मोफत उपचार दिले जाणार आहेत, अशी माहिती मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.के.अनिल रॉय यांनी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. शहरातील आर्थिक परिस्थिती कमी असलेल्या नागरिकांना वायसीएममध्ये मोफत औषधोपचार केले जातात. मात्र वाढत्या नागरिकीकरणाचा परिणाम म्हणून शहरातील लोकसंख्या वाढते आहे. त्यामुळे सार्वजनिक सेवांवर परिणाम होतो आहे, असेही डॉ. रॉय यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment