सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. प्रत्येकजण गणरायाच्या स्वागताच्या तयारीला लागला आहे. ज्या प्रमाणे घरामध्ये गणरायाचे स्वागत केले जाते तसेच सार्वजनीक गणेश मंडळांकडूनही गणरायाचे स्वागत केले जाते. गणेश मंडळांकडून गणरायाच्या स्वागतासाठी आणि दहा दिवसांच्या कार्यक्रमासाठी वर्गणी गोळा केली जाते. मात्र, मंडळाला वर्गणी गोळा करायची असेल तर अगोदर धर्मादाय आयुक्तालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून ऑनलाइन पद्धत्त सुरू करण्यात आली असून, गणेश मंडळांना २७ ऑगस्टपासून नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर आयुक्तालयाची वर्गणीसाठी परवानगी दिली जाणार आहे.
No comments:
Post a Comment