Monday, 20 August 2018

चाकण, राजगुरूनगर नगरपरिषदेची हद्दवाढ लालफितीत अडकली

सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल केली याचिका
चाकण : चाकण शहराच्या आणि जवळच्या ग्रामपंचायतींच्या विकासाला चालना मिळावी यासाठी प्रस्तावित करण्यात आलेली हद्दवाढ प्रशासकीय स्तरावर लालफितीत अडकून पडली आहे. जवळच्या ग्रामपंचायतींचा संमिश्र प्रतिसाद आणि प्रशासकीय स्तरावर होत असलेला विलंब यामुळे याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामुळे राज्य शासनाचा नगरविकास विभाग याबाबत आता काय भूमिका घेणार यावरच जवळच्या ग्रामपंचायतींचे अस्तित्व अवलंबून असणार आहे. चाकण शहराच्या आणि जवळच्या ग्रामपंचायतींच्या विकासाला चालना मिळावी यासाठी हद्द्वाढी संदर्भात उपविभागीय अधिकारी खेड, तहसीलदार खेड, चाकण नगरपरिषद यांच्याकडे चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला आहे. चाकणजवळचे ग्रामीण क्षेत्र नगरपरिषदेत समाविष्ट करण्यासाठी पूरक स्थिती त्यामधून समोर आली आहे.

No comments:

Post a Comment