Thursday, 6 September 2018

“पीएमपी’ अध्यक्षांना महापौरांची “तंबी’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने “पीएमपीएमएल’करिता 200 बस खरेदीचा प्रस्ताव उद्या (दि.6) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरीकरिता ठेवण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी या सभेला “पीएमपीएमएल’च्या अध्यक्षा नयना गुंडे स्वत: उपस्थित राहिल्या नाहीत, तर बस खरेदीचा प्रस्ताव फेटाळण्याचा इशारा महापौर राहुल जाधव यांनी दिला आहे. गुंडे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधत हा इशारा दिला आहे.

No comments:

Post a Comment