पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेळेत कामे होत नाहीत. केवळ आर्थिक देवाण-घेवाणीत हे अधिकारी मश्गुल असतात. त्यांच्या या स्वैरवर्तनावर बंधने आणण्यासाठी अधिकाऱ्यांच्या ऍन्टी चेंबरमध्ये सुस्पष्ट आवाज ऐकू येणारे सीसीटीव्ही बसवावेत. तसेच, या अधिकाऱ्यांना वचक बसविण्यासाठी नव्याने धोरण तयार करण्याची मागणी स्थायी सदस्यांनी केली. बुधवारी (दि.5) पार पडलेल्या स्थायीच्या साप्ताहिक सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

No comments:
Post a Comment