पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह अनेकजण विविध कामासाठी वरचेवर रस्त्यांमध्ये आणि आसपास खोदकाम करत असतात. खोदकाम करताना ठेकेदार हलगर्जीपणाने काम करत असतो. त्यामुळे भूमिगत उच्चदाब वीजवाहिन्या तुटत आहेत. वर्षभरात दोन्ही शहरात सुमारे साडेचारशे वीजवाहिन्या तुटल्या आहेत. यामुळे सुमारे तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यातच वीजवाहिनी तुटल्यामुळे संबंधित भागातील वीजपुरवठा खंडित राहत असल्याने नुकसानीची मोजणी करणे अवघड आहे, अशी माहिती पुणे परिमंडलातील उच्चपदस्थ अधिकार्यांनी दिली. दरम्यान, शहरात भूमिगत वीजवाहिन्या तुटण्याचे सर्वाधिक प्रकार पद्मावती, धनकवडी, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, कात्रज, आंबेगाव, गुलटेकडी, भवानी पेठ, गंजपेठ, सहकारनगर, बालाजीनगर, सातारा रस्ता या भागात झाले असल्याचे दिसून आले आहे. पुण्यात तीनशे तर पिंपरी चिंचवड भागात सुमारे दीडशे वाहिन्या वर्षभरात तुटलेल्या आहेत.
No comments:
Post a Comment