Wednesday, 12 September 2018

आयटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना संसदेत वाचा फोडणार

एकीकडे पुण्याच्या वाहतुकीचा सातत्याने वाढत असणारा त्रास आणि दुसरीकडे अनेक आयटी कंपन्यांनी 'स्वीकारलेली' कर्मचाऱ्यांच्या सक्तीच्या 'ले-ऑफ'सारखी अनेक नकारात्मक धोरणे, अशा कचाट्यात सापडलेल्या आयटी कर्मचाऱ्यांनी आता जमेल त्या दिशेने मदतीची आस ठेवायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून आयटी कर्मचाऱ्यांच्या शोषणाविरोधात आवाज उठविण्यासाठी स्थापण्यात आलेल्या 'फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज'(फाइट) या नोंदणीकृत कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी या वेळी त्यांनी सुळे यांच्यापुढे मांडल्या. या वेळी आयटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना संसदेत वाचा फोडण्याचे आश्वासन सुळे यांनी दिले.

No comments:

Post a Comment