नगरसेवक विकास डोळस यांच्या पाठपुराव्याला यश
दिघी:सैनिकांच्या मुलांसाठी पीएमपीएमएलकडून दिघी ते डेक्कन स्कूल बससेवा सुरु करण्यात आली आहे. नगरसेवक विकास डोळस यांच्या हस्ते सोमवारी बसचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेवक लक्ष्मण उंडे, नगरसेविका निर्मला गायकवाड, हिराबाई घुले, कुलदिप परांडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिघीमध्ये आजी-माजी सैनिकांची संख्या मोठी असून, अनेकजण खूप वर्षांपासून दिघीमध्येच स्थायिक झाले आहेत. सैनिकांची मुले डेक्कन येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षणसाठी जातात. या मुलांना शाळेत जाण्यासाठी पीएमपीएलची बस सेवा नव्हती. दिघी ते डेक्कन अशी पीएमपीएलची बस सुरु करण्याची मागणी स्थायी समितीचे सदस्य विकास डोळस यांनी केली. त्याबाबत त्यांनी पीएमपीएमएल प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आजपसासून बस सेवा सुरु झाली आहे. ही बस दिघी जकात नाका ते डेक्कन अशी धावणार आहे. सकाळी दोन बस धावणार आहेत.
No comments:
Post a Comment